बिबट्याच्या हल्ल्यात गणेगावात ४ मेंढ्या ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्याच्या हल्ल्यात
गणेगावात ४ मेंढ्या ठार
बिबट्याच्या हल्ल्यात गणेगावात ४ मेंढ्या ठार

बिबट्याच्या हल्ल्यात गणेगावात ४ मेंढ्या ठार

sakal_logo
By

रांजणगाव गणपती, ता. २३ : गणेगाव खालसा (ता. शिरूर) येथे मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार मेंढ्या ठार झाल्या.
गणेगाव खालसा परिसरात धनंजय तिखोळे यांनी शेतावर मेंढ्यांसाठी वाडा केला होता. रविवारी (ता. २२) रात्री दीडच्या सुमारास बिबट्याने वाड्यावर हल्ला केला. त्यातून चार मेंढ्या जागेवर ठार झाल्या. कुटुंबातील पुरुष शिंदेवाडी येथे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला गेले होते. वाड्यावर असणाऱ्या या कुटुंबातील महिलांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने येथून धूम ठोकली. वनकर्मचारी हेमंत कारकूड यांनी पंचनामा केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01725 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top