निरोगी आयुष्यासाठी मल्लखांबासारखा व्यायाम गरजेचा : बाबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरोगी आयुष्यासाठी मल्लखांबासारखा व्यायाम गरजेचा : बाबर
निरोगी आयुष्यासाठी मल्लखांबासारखा व्यायाम गरजेचा : बाबर

निरोगी आयुष्यासाठी मल्लखांबासारखा व्यायाम गरजेचा : बाबर

sakal_logo
By

रांजणगाव गणपती, ता. १६ : निरोगी आयुष्य जगण्यासाठी मल्लखांबासारखा व्यायाम करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी मल्लखांब ही कला जोपासून क्रीडा जगतात नाव लौकीक मिळवावा. असे आवाहन शिरूर तालुका गटशिक्षण अधिकारी अनिल बाबर यांनी केले.
भांबर्डे (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेत सहावा जागतिक मल्लखांब दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे व मल्लखांबाचे पूजन यावेळी महिलांच्या हस्ते करण्यात आले. मुलांनी साहसी व नेत्रदीपक मल्लखांब प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. यावेळी मुख्याध्यापक विलास जासूद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरख मस्के, विषयतज्ज्ञ प्रदीप देवकाते, माजी मुख्याध्यापक शिवाजी वीर, गोरक्ष पवार, शिवाजी पवार, सदाशिव थोरात, प्रीती पवार, शीतल पवार, रूपाली पवार, माजी सैनिक रोहिदास पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल देशमुख यांनी केले. गोरक्षनाथ नानेकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01778 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top