ठिकेकरवाडी येथे सेंद्रिय शेतीवर परिसंवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठिकेकरवाडी येथे सेंद्रिय शेतीवर परिसंवाद
ठिकेकरवाडी येथे सेंद्रिय शेतीवर परिसंवाद

ठिकेकरवाडी येथे सेंद्रिय शेतीवर परिसंवाद

sakal_logo
By

ओतूर, ता.२८ : ठिकेकरवाडी (ता.जुन्नर) येथे ग्रामपंचायत व केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेतीवर परिसंवादाचे आयोजन केले होते. यामध्ये जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर आणि पारनेर तालुक्यातील सुमारे ९० शेतकरी प्रशिक्षणास उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयामार्फत ''किसान भागीदारी प्रार्थमिकता हमारी'' हे अभियान २५ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान संपूर्ण देशात सुरू आहे. हे प्रशिक्षण घेतलेले फोरकास्ट अग्रोटेक कंपनीची उत्पादने आणि त्याविषयी माहिती देण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केले होते.
सदर प्रशिक्षणात डॉ. प्रफुल्ल गाडगे यांनी जीवाणूंचे शेतीतील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. संतोष सहाणे यांनी बायोगासचे महत्त्व आणि त्यापासून तयार होणारी गोरस आणि गोप्रोम ही उत्पादने शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यास कशी उपयोगी पडतात याविषयी मार्गदर्शन केले.
अग्रीकल्चर इन्शुरन्स ऑफ इंडिया कंपनीचे तालुका समन्वयक नंदकिशोर खेडकर यांनी पंतप्रधान पीक विमा याविषयी तर पिकांवर वाढणाऱ्या किडी रोगांची समस्या कमी करण्यासाठी जैविक खते आणि औषधांचा वापर कसा करावा, विषमुक्त अन्न तयार करावे याबाबत प्रशासन अधिकारी शरद कोकणे यांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत रफ्तार या योजनेतून कृषी उद्योजकांच्या नवीन संकल्पनांना बळ देण्याचे काम केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्था करत असून तरुणांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन योजनेचे समन्वयक हेमंत लडगांवकर यांनी केले. सरपंच संतोष ठिकेकर यांनी प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत केंद्रीय कापूस संस्थेचे आभार व्यक्त केले.
यावेळी २५ भाग्यवान शेतकऱ्यांना ७५००० रुपये किमतीची जैविक शेती उत्पादने फोरकास्ट अग्रोटेक कंपनीच्या माध्यमातून वाटप करण्यात आली. यावेळी जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष कृषिभूषण जितेंद्र बिडवई, डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष आदिनाथ चव्हाण, रोहोकडी टोमाटो शेतकरी उत्पादक गटाचे अध्यक्ष अजित घोलप, आलमेच्या सरपंच शीतल फोडसे, अजय बेल्हेकर उपस्थित होते.

02645

Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01566 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top