ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत ओतूर केंद्राचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत ओतूर केंद्राचे यश
ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत ओतूर केंद्राचे यश

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत ओतूर केंद्राचे यश

sakal_logo
By

ओतूर, ता. ३० ः ओतूर (ता. जुन्नर) हे केंद्र असलेल्या आणि कोल्हापूरच्या गोरेज फाउंडेशनचे वतीने २७ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती परीक्षेत ओतूर केंद्रातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याची माहिती परीक्षेचे समन्वयक बी. आर. खाडे यांनी दिली.
यावर्षी ओतूर केंद्रावर ११९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. नुकताच परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व शाळा पुढीलप्रमाणे ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओतूर नंबर १मधील कार्तिकेय प्रशांत कुतळ, इयत्ता तिसरी ९३ गुण मिळवून ५९वी रँक. स्पंदन अमोल आरेकर इयत्ता पहिली ९६ गुण मिळवून ५९ रँक. वरद रामदास डोंगरे इयत्ता तिसरी ९४ मिळवून ४२वी रँक. आरुष संतोष कांबळे इयत्ता तिसरी ८३ गुण मिळवून ब्राँझ पदक. युवराज मिलिंद खेत्री ८१ गुण मिळवून ब्राँझ पदक, हर्ष मनोहर वामन ८० गुण मिळवून ब्राँझ पदक पटकाविले.
जिल्हा परिषद शाळा ओतूर नंबर २च्या संचिता मोहन वाबळे, इयत्ता दुसरी ८५ गुण मिळवून ब्राँझ पदक मिळवले.
जिल्हा परिषद शाळा वांगी बीडमधील साई समर्थ गणपत हाडूळे इयत्ता दुसरी ९३ गुण मिळवून रौप्यपदक पटकाविले. अभंगवाडी शाळेतील आरोही सत्यवान अभंग इयत्ता दुसरी ८७ गुण मिळवून ब्राँझ पदक मिळवले.
अभंगवाडी शाळेतील रुद्रा नवनाथ अभंग इयत्ता दुसरी ८३ गुण मिळवून रौप्यपदक, सोहम प्रशांत शेटे इयत्ता तिसरी ८८ गुण मिळवून रौप्यपदक मिळवले.
अवधूत प्रतीक अकोलकर चैतन्य विद्यालय ओतूर ८४ गुण मिळवून ४८ वी रँक मिळवली. सोहम संतोष भगत, चैतन्य विद्यालय ओतूर इयत्ता सहावी ७१ गुण मिळवून ब्राँझपदक मिळवले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, के. बी. खोडदे, शिवाजी डुंबरे, दुंदा भालिंगे, ओतूर ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे, लक्ष्मण फापाळे, सुमन गवारी, सविता घाडगे-चासकर, दीपाली वडनेरे आदींनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01567 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top