...परत चुलीकडे वळावे लागणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...परत चुलीकडे वळावे लागणार!
...परत चुलीकडे वळावे लागणार!

...परत चुलीकडे वळावे लागणार!

sakal_logo
By

ओतूर, ता. ६ ः ‘‘गॅस सिलिंडरच्या किमती सरकारने त्वरित कमी कराव्यात अन्यथा पुढील काळात गॅस वापरणे बंद करून परत चूल व लाकडाचा वापर सुरू करावा लागेल, ’’ अशा शब्दांत महिलांनी गॅस दरवाढीबद्दल नाराजी व्यक्त केली.

ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायत सभागृहात उज्ज्वला दिनाचे औचित्य साधून महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ओतूरच्या सरपंच गीता पानसरे होत्या. डी.डी.एच.पी. गॅस एजन्सी ओतूर व आराध्या एच.पी.गॅस एजन्सी बेल्हा यांच्या सहकार्याने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, ओतूरचे उपसरपंच प्रशांत डुंबरे, डी.डी.एच. पी. गॅस एजन्सीचे दयानंद डुंबरे, आराध्या एच.पी.गॅस एजन्सीचे अशोक बोरचटे व प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभधारक महिला उपस्थिती होत्या.
यावेळी सरपंच गीता पानसरे यांनी गॅस सिलिंडर रिफिलिंग व नविन कनेक्शन नागरीकांना त्वरित उपलब्ध होत असल्याबद्दल,तसेच गॅस बाबत चांगली व तत्पर सेवा मिळत असल्याबद्दल एजन्सीच्या कामाचे कौतुक केले.दरम्यान, उपस्थित महिलांनी गॅस दरवाढीवरून नाराजी व्यक्त केली. कित्येक कुटुंबांनी गॅस परवडत नसल्याने स्वयंपाकासाठी इतर साधनाचा वापर सुरू केला असल्याचे महिलांनी सांगितले. यापार्श्वभुमीवर गॅसचे दर कमी करून सरकारने नागरीकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

UDA22B02658

Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01571 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top