जुन्नरला अपघातात तीन ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरला अपघातात तीन ठार
जुन्नरला अपघातात तीन ठार

जुन्नरला अपघातात तीन ठार

sakal_logo
By

ओतूर, ता. १० ः जुन्नर- मढ मार्गावर गणेशखिंडीत पिकअप गाडीला अपघात होऊन तीन जण ठार झाले असून वीसजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांत चार वर्षाच्या बालकाचा समावेश आहे.
मंगळवारी (ता. १०) रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला असून अपघातातील जखमींना जुन्नर, ओतूर व आळेफाटा येथे उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली. सदर पिकअप गाडी ही सितेवाडी (ता. जुन्नर) येथील कोटमवाडी परीसरातील असून गाडीमधील सर्वजण एक धार्मिक विधी करून परत येत होते. जुन्नर- मढ मार्गावरील गणेशखिंडीत तीव्र उतारावर पिकअप गाडीचे ब्रेकफेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात विघ्नेश विलास सांगडे (वय ४), शांताराम दादाभाऊ भारती (वय ४५), बारकाबाई महादू भोईर (वय ५८) (सर्व रा.सितेवाडी- कोटमवाडी, ता. जुन्नर जि.पुणे) यांचा मृत्यू झाला. जखमींची नावे समजू शकली नाहीत.

Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01577 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top