
गणेश खिंडीतील अपघातप्रकरणी एकावर गुन्हा
ओतूर, ता. ११ ः जुन्नर-मढ मार्गावरील गणेश खिंडीमध्ये मंगळवारी रात्री पिकअप पलटी होऊन झालेल्या अपघातात तीन ठार तर सोळा जखमी झाले होते. या अपघातप्रकरणी ओतूर पोलिसात पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.
सदर अपघात प्रकरणी पिकअप चालक गुणाजी वसंत पाटेकर (रा. सितेवाडी ता. जुन्नर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत नामदेव यशवंत शेखरे यांनी फिर्याद दिली आहे.
मंगळवारी रात्री दहा ते अकरा दरम्यान आंबेहातवीज येथील दुर्गाबाई येथून धार्मिक विधी करून परत जुन्नर- मढ मार्गाने सितेवाडी येथे येत असताना गणेश खिंडीत पिकअपला अपघात होऊन ती पलटी झाली या अपघातात चार वर्षाच्या बालकांसह तीन जण ठार झाले.
सदर अपघाताचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आकाश शेळके करत आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01578 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..