जुन्नर तालुक्यात ‘नेबरहूड क्लास’ ठरतोय प्रभावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नर तालुक्यात ‘नेबरहूड क्लास’ ठरतोय प्रभावी
जुन्नर तालुक्यात ‘नेबरहूड क्लास’ ठरतोय प्रभावी

जुन्नर तालुक्यात ‘नेबरहूड क्लास’ ठरतोय प्रभावी

sakal_logo
By

ओतूर, ता. १२ : जुन्नर तालुक्यातील ४२ आदिवासी गावामध्ये चाइल्ड फंड इंडिया संस्थेकडून मुलांना शाळेची आवड टिकून राहावी म्हणून कोरोना काळात शाळा बंद झाल्यापासून गेल्या दीड वर्षापासून नेबरहूड क्लास ही थीम वापरून मुलांना नैसर्गिक संसाधनाचा वापर करून शिक्षण दिले जात आहे.
चाइल्ड फंड इंडिया ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी सामाजिक संस्था आहे. या संस्थेच्या पुणे शाखेचे जुन्नर तालुक्यातील ४२ आदिवासी गावामध्ये लहान मुलं, युवक, महिला, अंगणवाडी, शाळा यांसाठी सामाजिक उपक्रम राबविले जातात.
यानुसारच शिक्षणासाठी ६ ते १४ वयाच्या शाळेत जाणारी मुलं व मुली यांच्या कलागुणांना वाव मिळावा, नैसर्गिक उपलब्ध संसाधने वापरून निसर्गाच्या सानिध्यात त्यांना आनंददायी शिक्षण मिळावे, शाळेसोबतच घरी आल्यावर अभ्यासाची उजळणी व्हावी व प्रत्येकाला आपल्यातील सुप्त गुण शोधण्याची संधी मिळावी या उद्देशाने गावातील मध्यावर किंवा शेताच्या, झाडांखाली, डोंगराच्या शेजारी नेबरहूड क्लास आयोजित केली जातात.
या कार्यक्रमांसाठी चाइल्ड फंड इंडिया संस्थेच्या महाराष्ट्र राज्य प्रोग्रॅम स्पेशालिस्ट जेकब शाईनी व पुणे शाखेचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी अभिजित मदने मार्गदर्शन करतात. तसेच जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चाइल्ड फंड इंडिया संस्थेचे सर्व कर्मचारी गावपातळीवर परिश्रम घेत आहेत.

निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण
दीड वर्षापासून ७५० मुलांसाठी ४२ गावांमध्ये नियमित नेबरहूड क्लास सुरू करण्यात आले. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मुलांना अंकगणित, इंग्रजी, भाषा ज्ञान, विज्ञान, भूगोल, बाल हक्क व संरक्षण आणि पर्यावरण विषयी ज्ञान वाचन, चर्चा, प्रश्नोत्तरे, विविध खेळ, कथा, प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते.

Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01579 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top