
ग्रामसेवकाला मारहाण करणारा अटकेत
ओतूर, ता. १३ ः मांडवे (ता. जुन्नर) येथील ग्रामसेवकाला मारहाणप्रकरणी ओतूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून संबंधित आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.
विलास पुनाजी बुळे (रा. मांडवे ता. जुन्नर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ग्रामसेवक पंडित सोपान केदारी यांनी ओतूर पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मांडवे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पंडित केदारी यांच्याकडे कोपरे ग्रामपंचायतीचा ही अतिरिक्त कारभार आहे. केदारी हे बुधवारी मांडवे ग्रामपंचायतीच्या समोर उभे असताना विलास पुनाजी बुळे याने बखळ जागेची नोंद करून देण्याच्या कारणावरून केदारी यांना खाली पाडून मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच त्यांना मारहाणी बरोबरच शिवीगाळ दमदाटी केल्याची फिर्याद केदारी यांनी दिली असून फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी विलास बुळे यास अटक केली आहे.
मारहाणीचा निषेध
ग्रामसेवक पंडित केदारी यांना झालेल्या मारहाणीचा जुन्नर तालुका ग्रामसेवक संघटनेनी जाहीर निषेध केला आहे. तसेच १८ मे रोजी होणाऱ्या ग्रामसेवक आढावा बैठकीला सर्व ग्रामसेवक काळी फीत लावून सदर घटनेचा निषेध व्यक्त करणार आहे. याबाबत पत्र संघटनेनी गटविकास अधिकारी यांच्या नावे दिले आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01580 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..