मढ येथे इंद्रायणीच्या बियाण्यांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मढ येथे इंद्रायणीच्या बियाण्यांचे वाटप
मढ येथे इंद्रायणीच्या बियाण्यांचे वाटप

मढ येथे इंद्रायणीच्या बियाण्यांचे वाटप

sakal_logo
By

ओतूर, ता.४ : मढ (ता.जुन्नर) येथे तळेरान, निमगिरी, केवाडी, देवळे या आदिवासी गावातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरीब असलेल्या ५१ शेतकऱ्यांना चाईल्डफंड इंडिया संस्थेकडून मोफत इंद्रायणी जातीचे भात बियाणे वाटप करण्यात आले.
जुन्नर तालुक्यात आदिवासी व डोंगराळ भागातील कित्येक आर्थिक दुर्बल व गरीब आदिवासी शेतकऱ्यांना संस्थेने ५१ शेतकऱ्यांना प्रत्येकी २५ किलो मोफत इंद्रायणी जातीचे भात बियाण्याचे वाटप केले.
बियाणे वाटपप्रसंगी चाईल्डफंड इंडिया संस्थेच्या महाराष्ट्र प्रमुख शायणी जेकब, पुणे विभाग व्यवस्थापक अभिजित मदने यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या मढ कार्यालयातील मुक्ता गिरी, अक्षय तांबे, अजित जोर, प्रणीत नायकोडी, ज्योती शिवमोरे, इर्शाद शेख, अमोल मगर यांनी यशस्वीपणे पार पाडला.
यावेळी पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी तुळशीराम भोईर, उद्योजक महेंद्र उत्तम मोजाड व चाईल्डफंड इंडिया संस्थेचे इतर कर्मचारी व लाभधारक शेतकरी उपस्थित होते.

02748

Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01607 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top