युवकाने परतविला बिबट्याचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवकाने परतविला 
बिबट्याचा हल्ला
युवकाने परतविला बिबट्याचा हल्ला

युवकाने परतविला बिबट्याचा हल्ला

sakal_logo
By

ओतूर, ता. २१ : पिंपळगाव जोगे (ता. जुन्नर) येथे रविवारी (ता. १९) सकाळी बिबट्याने युवकावर हल्ला केला. त्यावेळी युवकाने प्रसंगावधान राखून लाथा मारून बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे युवकाचे प्राण वाचले. मात्र, तो किरकोळ जखमी झाला. प्रथमेश नारायण सस्ते (वय २२), असे या जखमी युवकाचे नाव आहे.
याबाबत ओतूर वनविभागाचे वनक्षेत्रपाल वैभव काकडे व वनपाल सचिन मोडवे यांनी माहिती दिली की, प्रथमेश सस्ते हा सकाळी घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या शेतात ठिबक सिंचनाच्या नळ्या पांगवण्याचे काम करत होता. त्याच्यावर अचानक बिबट्याने झडप घातल्याने तो खाली पडला. मात्र, खाली पडल्यावर त्याने बिबट्याला लाथा मारून प्रतिकार केला. त्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. या हल्ल्यात प्रथमेश याला बिबट्याचे नखे खांद्यावर लागून तो किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. ओतूर वनविभागाचे वनरक्षक शौकत मोमीन यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01638 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top