ओतूरमधील ईदची कुर्बानी मंगळवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओतूरमधील ईदची कुर्बानी मंगळवारी
ओतूरमधील ईदची कुर्बानी मंगळवारी

ओतूरमधील ईदची कुर्बानी मंगळवारी

sakal_logo
By

ओतूर, ता.८ ः हिंदू धर्मीयांची आषाढी एकादशी व मुस्लिम बांधवांची बकरी ईद येत्या रविवारी एकाच दिवशी आली असली तरी ओतूर (ता. जुन्नर) मुस्लिम बांधवांनी एकादशीला ईदची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेऊन एकादशीचा मान ठेवला आहे.
ओतूर शहरातील मुस्लिम बांधवांनी रविवारचा बकऱ्यांचा कुर्बानीचा कार्यक्रम रद्द करून त्या ऐवजी फक्त नमाज पठण करायचे व कुर्बानी कार्यक्रम मंगळवारी करण्याचे ठरविले आहे. ओतूर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाज ट्रस्टच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी माजी उपसरपंच रईस मणियार, हाजी चांद मोमीन, रशीद मोमीन, शकील तांबोळी, रज्जाक इनामदार, सलीम मणियार, शौकत शेख, शाही मज्जिदचे मौलाना सिद्दिकी , पापा मोमीन, शक्ती मोमीन, सिकंदर तांबोळी, सलमान तांबोळी, फैय्याज इनामदार,सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01657 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top