चिल्हेवाडी धरणातून मांडवी नदीत विसर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिल्हेवाडी धरणातून मांडवी नदीत विसर्ग
चिल्हेवाडी धरणातून मांडवी नदीत विसर्ग

चिल्हेवाडी धरणातून मांडवी नदीत विसर्ग

sakal_logo
By

ओतूर, ता. ११ ः जुन्नर येथून जवळच असलेल्या चिल्हेवाडी धरण परिसरात जोरदार पाऊस चालू असून धरणातून बाराशे क्युसेकने मांडवी नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्याची माहिती चिल्हेवाडी धरणाचे शाखा अभियंता शशिकांत माने यांनी दिली.
चिल्हेवाडी धरणातून सोमवारी दुपारी चारच्या दरम्यान मांडवी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. नदी पात्राजवळील शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. सध्या धरणात ०.६१५ टीएमसी एकूण पाणीसाठा आहे. तर धरण ७६ टक्के भरले आहे. धरण परिसरात सोमवारी सकाळी सहापर्यंत चोवीस तासात ६० मिलिमीटर व नंतर सायंकाळी सहापर्यंत ३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आज पर्यंत एकूण २४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01666 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top