चैतन्य विद्यालयात हस्ताक्षर स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चैतन्य विद्यालयात हस्ताक्षर स्पर्धा
चैतन्य विद्यालयात हस्ताक्षर स्पर्धा

चैतन्य विद्यालयात हस्ताक्षर स्पर्धा

sakal_logo
By

ओतूर, ता. १ : ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अग्रगण्य असणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती संयुक्तरित्या साजरी केल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रदीप गाढवे होते. या वेळी सहसचिव पंकज घोलप, उपमुख्याध्यापिका अंजनी डुंबरे, पर्यवेक्षक प्रतीक अकोलकर, राजश्री भालेकर, शरद माळवे, राजाराम शिंदे, सुरेखा ढमाले, ज्ञानेश्वर वळे, मंगेश तांबे, विशाल चौधरी, प्रमोद जाधव, अमित झरेकर उपस्थित होते.
या वेळी मराठी, इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी देवचंद नेहे, संतोष सोनवणे, लक्ष्मण दुडे मिलिंद खेत्री, वैभव देशमुख, सोनाली माळवे, सोनाली कांबळे, बाळासाहेब साबळे, सत्यवान खंडाळे, भरत भाईक, अपेक्षा गोरे, स्वप्नाली देशमुख, अश्विनी नलावडे, प्रमिला जाधव, वैभव घोडके, संजय डुंबरे, रामदास ठोसर, विजय खरात, प्रसन्ना तांबे, जाधव, शिवाजी उर्किर्डे, ईश्वर ढमाले, सुनील शितोळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब खाडे यांनी तर आभार अजित डांगे मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01688 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top