ई पीक पहाणीचे ॲप डाउनलोड करणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई पीक पहाणीचे ॲप डाउनलोड करणे
ई पीक पहाणीचे ॲप डाउनलोड करणे

ई पीक पहाणीचे ॲप डाउनलोड करणे

sakal_logo
By

ओतूर, ता.६ : शेतकऱ्यांनी ई पी पाहणी करावी. ती न केल्यास पिकविमा योजना, नुकसानभरपाई पंचनामा, शासकीय मदत किंवा इतर शासकीय कोणतीही योजनांचा लाभ मिळण्यासाठी अडचण येऊ शकते. भविष्यात शासकीय योजनाचा लाभ घेताना ई पीक पहाणी नसेल तर तांत्रिक समस्या निर्माण होणार आणि मुदत संपली की खरीप ई पिकपहाणी करताही येणार नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी ई पिकपहाणी ॲप डाऊनलोड करून प्रत्येक्ष शेतात जाऊन ई पीक पहाणी करने आवश्यक आहे, असे जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून महसूल विभागाला सहकार्य करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे ओतूरचे मंडल अधिकारी विजय फलके व डिंगोरेचे मंडल अधिकारी दत्तात्रेय केंगले यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

अशी करा पिकाची ई-पिक पाहणी
१. शेतकऱ्यांनी प्ले स्टोअरमधून ‘ई-पिक पाहणी’ हे ॲप डाऊनलोड करावे.
२. ॲप ओपन करून नवीन खातेदार नोंदणी करुन घ्यावी.
३. आपला जिल्हा, तालुका आणि गावाची निवड करावी
४. खातेदारमध्ये पहिले नाव, गट क्रमांक टाकावा
५. खातेक्रमांक तपासून आपला मोबाईल नंबर टाकावा.
६. मोबाईलवर चार अंकी पासवर्ड येईल तो कायम लक्षात ठेवावा लागणार आहे.
७. तुमची नोंदणी यशस्वी होणार आहे. यानंतर ॲप हे पूर्णपणे बंद करुन चालू करायचे आहे.

असे आहे ॲप...
ॲप पुन्हा चालू केल्यानंतर पुन्हा तुम्हाला खातेदार म्हणजे तुमचे नाव निवडावे लागेल. मॅसेजद्वारे आलेला पासवर्ड येथे नमूद करायचा आहे. त्यानंतर पुढे जाऊन परिचयमध्ये खातेदाराचा फोटो अपलोड करायचा त्यानंतर दिलेली माहिती भरून सबमिट करायचे. त्यानंतर होममध्ये येऊन पिकाची माहिती नोंदवा, असा एक फॅार्म येतो. यामध्ये खातेक्रमांक नंतर गट क्रमांक, जमिनीचे क्षेत्र हे हेक्टरमध्ये भरायचे यानंतर हंगाम निवडायचा म्हणजे खरीप की संपूर्ण वर्ष ते निवडायचे, त्यानंतर पीक पेरणीसाठीचे क्षेत्र किती याचा उल्लेख करायचा आहे. त्यानंतर पिकाचा वर्ग यामध्ये जे आपलं पिक आहे तेच निवडायचे यातील वेगवेगळे प्रकारही असू शकतात. त्यानंतर दिलेल्या पर्यापैकी तुमचं कोणतं पिक ते निवडायचे आहे. पुन्हा त्या पिकाचे क्षेत्र भरायचे.. त्यानंतर सिंचनाचे साधन काय आहे त्याचा उल्लेख करायचा त्यानंतर ठिबक पध्दती कशी आहे याची दिलेल्या पर्यातून निवड करायची..त्यानंतर पिक लागवडीची तारीख याची नोंद करायची. त्यानंतर कॅमेराचा पर्याय येईल यातून फोटो काढायचा आणि तो फॅार्म सबमिट करायचा आहे. सबमिट झाल्यानंतर पुन्हा होमवर यायचं ही नोंदवलेली माहिती केवळ तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01695 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..