डोमेवाडीत गोपाल कृष्णजयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोमेवाडीत गोपाल कृष्णजयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह
डोमेवाडीत गोपाल कृष्णजयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह

डोमेवाडीत गोपाल कृष्णजयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह

sakal_logo
By

ओतूर : डोमेवाडी (ता.जुन्नर) येथे विश्वंभर महाराज पुण्यतिथी तथा गोपाल कृष्ण जयंतीनिमित्त १४ ते २१ ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बबन भोरे व बाबाजी डुंबरे यांनी दिली.
सप्ताहानिमित्त दैनंदिन पहाटे ३:३० ते ७ काकडा भजन, सकाळी ८ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी २ ते ४ गाथा भजन, सायंकाळी ५.३० ते ६.३० हरिपाठ, ७ ते ९ कीर्तन, रात्री ९ वाजता महाप्रसाद व हरिजागर कार्यक्रम होणार आहेत.
सप्ताहात विष्णू महाराज साठे (विदर्भ), सुरेश महाराज जाधव (मुंबई), तुकाराम महाराज उराडे (नातेपुते), सुनील महाराज झांबरे (आष्टी ), महादेव महाराज खापरे (कल्याण), विलास महाराज गेजगे (परभणी), समाधान महाराज शर्मा (केज बीड) यांचे कीर्तन होणार असून दुपारी २ वाजता काठी मिरवणूक, नंतर शेरणी वाटप, महिलांच्या फुगड्या व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे. रविवारी (ता.२१) समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे सकाळी काल्याचे कीर्तन होईल.

Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01703 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..