सामाजिक बांधिलकी जपत ओतूरला १७५ दात्यांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामाजिक बांधिलकी जपत
ओतूरला १७५ दात्यांचे रक्तदान
सामाजिक बांधिलकी जपत ओतूरला १७५ दात्यांचे रक्तदान

सामाजिक बांधिलकी जपत ओतूरला १७५ दात्यांचे रक्तदान

sakal_logo
By

ओतूर (ता. जुन्नर), ता. १६ ः येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिवसह्याद्री युवा मंच व चैतन्य हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८ वे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये १७५ दात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले.

ओतूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिल केरुरकर यांनी रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अक्षय ब्लड बँक, पुणे यांनी रक्त संकलित केले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसह्याद्री युवा मंचचे सभासद जयदीप डुंबरे, संतोष डुंबरे, गौरव डुंबरे, डॉ. वैभव गायकर, धनंजय डुंबरे, प्रवीण भांबुर्डेकर, अभिषेक घोलप, मयूर मते, गणेश डुंबरे, कुमार महापुरे, प्रवीण डुंबरे आदींनी परिश्रम घेतले.

ग्रीन व्हीजन फाउंडेशनच्या वतीने पांढरी मारुती मंदिर परिसरात झाडांची आकर्षक मांडणी केली होती. शिवनेरी विद्यालय धोलवड येथील मुलांनी स्वातंत्र्यावर आधारित पथनाट्य सादर केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01710 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..