ओतूर येथील २१ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओतूर येथील २१ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड
ओतूर येथील २१ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

ओतूर येथील २१ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

sakal_logo
By

ओतूर, ता. २४ : ओतूर (ता. जुन्नर) येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील २८ विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थ्यांची बहुद्देशीय कंपन्यांमध्ये आकर्षक पॅकेजवर निवड झाली.
नीलेश कुमकर याची बजाज ऑटोमध्ये इंजिनिअर पदावर दहा लाख वार्षिक पॅकेजवर निवड झाली. किरण काळे याची आय. डीइएमआय या कंपनीमध्ये वार्षिक पाच लाख पॅकेजवर निवड झाली. तसेच सिलेक्ट कंट्रोलमध्ये सहा विद्यार्थ्यांची निवड झाली त्यामध्ये दुर्गेश गौड, श्रीकांत ढेपे, प्राची गायकवाड, प्रियंका सावंत, दीपक मोरे, नूतन पाटील त्यांना वार्षिक तीन ते चार लाख पॅकेजवर निवड झाली. तसेच उमेश लोहकरे याची फ्लेक्स ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, अजय घाटगे याची एल्डर इक्विपमेंट, इराणी आफ्रिकी हिची थ्री डी आय, त्रिवेणी पाटील हिची कम्युनिकेशन टेस्ट डिझाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, उस्मान मोहम्मद याची सिटीडीआय, महेश शिंदे याची फाईन ऑरगॅनिक इंडस्ट्रीज, प्रियंका देठे हिची कार्गोपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड, पंकज भंडारी याची आशिदा इलेक्ट्रॉनिक्स, सुमीत घेवडे याची हुगे कॉमपटेल लिमिटेड, वाघ विलास याची स्कॅटो इंडिया, स्वाती झोमन हिची वैभव इन्स्ट्रुमेंटेशन, साहीद सय्यद याची प्रॉपरलर्निंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंदराव खरात यांनी दिली.
सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे, मानद सचिव वैभव तांबे यांनी केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01714 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..