खामुंडीतून दागिने पळवणाऱ्या भामट्याचे रेखाचित्र प्रसिद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खामुंडीतून दागिने पळवणाऱ्या भामट्याचे रेखाचित्र प्रसिद्ध
खामुंडीतून दागिने पळवणाऱ्या भामट्याचे रेखाचित्र प्रसिद्ध

खामुंडीतून दागिने पळवणाऱ्या भामट्याचे रेखाचित्र प्रसिद्ध

sakal_logo
By

उदापूर, ता. २२ : खामुंडी (ता. जुन्नर) येथे सोन्याचे दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने दागिने पळवणाऱ्या भामट्याचे रेखाचित्र ओतूर पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
खामुंडी येथील बदगी रोडवर राहणाऱ्या प्रभावती ज्ञानेश्वर शिंगोटे यांचे सोन्याचे दागिने उजळून देतो, असे खोटे सांगून भांडी घासायची पावडर विकण्यासाठी आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांची दोन पदरी तीन तोळ्याची सोन्याची बोर माळ व दोन पदरी साडेपाच तोळ्याचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, असे अंदाजे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळवून नेले. याबाबत ओतूर पोलीसात फिर्याद दिली होती.
सदर आरोपींस येथील अनिल बोडके यांनी पाहिले आहे. त्यांनी केलेल्या वर्णनाप्रमाणे पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र बनवून प्रसिद्ध केले आहे. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन ओतूरचे सहायक पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे व पोलिस उपनिरीक्षक अनिल केरुरकर यांनी केले आहे.

03040

Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01716 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..