हिंदू मातेचे मुस्लिम मुलाकडून पिंडदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदू मातेचे मुस्लिम मुलाकडून पिंडदान
हिंदू मातेचे मुस्लिम मुलाकडून पिंडदान

हिंदू मातेचे मुस्लिम मुलाकडून पिंडदान

sakal_logo
By

ओतूर, ता.२९ : खामुंडी (ता. जुन्नर) येथे एका हिंदू मातेला दिलेला शब्द मुस्लिम मुलाने अखेरपर्यंत पाळला. हिंदू आईच्या दशक्रिया विधीत मुस्लिम मुलाने मुंडण करून इतरांसह पिंडदान केले आहे. इकबाल शेख असे या मुलाचे नाव आहे. मित्राच्या मृत्यूनंतर त्याने आईला संभाळण्याचे दिलेले वचन शेवटपर्यंत पाळले.
काही वर्षांपूर्वी हिंदू-मराठा समाजाचे दत्तात्रेय खंडू कदम यांचे धोकादायक काम करताना पोलवरून खाली पडून मुंबई येथे अपघाती निधन झाले होते. दत्तात्रेय कदम यांच्या मातोश्री मंजुळाबाई खंडू कदम यांना मुलाच्या निधनानंतर त्याच्या गायमुखवाडी येथील मुस्लिम मित्र इकबाल यांनी सांत्वन करताना शब्द दिला होता की ''तुझा मुलगा गेला असला तरी त्याच्या रूपाने आजपासून मीच तुझा मुलगा आहे. मी मुलाचे कर्तव्य कदापिही विसरणार नाही.'' त्याप्रमाणे मुस्लिम समाजातील या मुलाने मानलेल्या आईचा व्यवस्थित सांभाळ करीत तिच्या निधनानंतर दशक्रिया विधीला हिंदुधर्म शास्त्राप्रमाणे एक मुलगा या नात्याने मुंडण केले. या मुस्लिम समाजातील मुलाबाबत सर्व स्तरातील व विविध धर्मियांमधून कौतुक होत आहे. या निमित्ताने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आदर्श दर्शन घडविल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.

माय लेकाच्या अतुट नात्याची चर्चा
इकबाल यांनी आईच्या शेवटच्या क्षणापर्यंत मुलगा म्हणूनच त्याने आपले कर्तव्य पार पाडले. आईने देखील या मुलाला माया, ममता, वात्सल्याने आपलेसे केले असल्याचे आज हा मुलगा अभिमानाने सांगतो. दहा दिवसांपूर्वी मंजुळाबाई खंडू कदम यांचे ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या दशक्रिया विधीच्या दिवशी खामुंडी या गावी त्या मातेला दिलेल्या वचनातून उतराई होण्यासाठी हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मुस्लिम मुलाने मुंडण करून पिंडदान केले. मातेच्या वचनातून मुक्त होण्याचा हृदयस्पर्शी प्रयत्न केला. या माय लेकाच्या या अतूट नात्याची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.


03088, 03089

Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01733 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..