‘मांडवी किनारा’ क्यूआर कोड सुविधा होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मांडवी किनारा’ क्यूआर कोड सुविधा होणार
‘मांडवी किनारा’ क्यूआर कोड सुविधा होणार

‘मांडवी किनारा’ क्यूआर कोड सुविधा होणार

sakal_logo
By

ओतूर, ता. १७ : ‘‘सभासद व सामाजिक हित जोपासणारी मांडवी किनारा पतसंस्था लवकरच सभासदांसाठी क्यूआर कोड सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे सभासद, ठेवीदार व कर्जदार यांचे आर्थिक व्यवहार अधिक जलद व सुलभ होणार आहे,’’ असे प्रतिपादन पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष संभाजी विठ्ठल तांबे यांनी केले.
ओतूर (ता. जुन्नर) येथे पतसंस्थेच्या २३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्षीय मनोगत त्यांनी माहिती दिली. यावेळी मंदाताई दांगट, मोनिका महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा नीलिमा तांबे, मोनिका शहा, संस्थेचे उपाध्यक्ष गणपत पा. डुंबरे, संचालक मल्हारराव डुंबरे, आशिष शहा, बबन तांबे, सीताराम ढमाले, अॅड. कैलास पानसरे, अॅड. जयराम तांबे, धोंडिभाऊ मोरे, डॉ. संजय वेताळ, डॉ. भरत घोलप, विठ्ठल तांबे, मंजुश्री डुंबरे, सविता थोरात, नितीन लेंडे,
तान्हाजी तांबे, अजित पानसरे, श्रीराम डुंबरे, जी. आर. डुंबरे, गणेश कुतळ, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बोचरे आदी उपस्थित होते.
अध्यक्ष तांबे म्हणाले, ‘‘पतसंस्थेच्या यशात सभासद ठेवीदारांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. ठेवी, कर्ज वाटप, गुंतवणूक, भागभांडवल, सभासद निधी, यामध्ये वाढ होत असून, प्रामुख्याने ४२ कोटी ठेवींचा टप्पा संस्थेने पार केला आहे. ३५ कोटी कर्ज वाटप करूनही संस्थेचे थकबाकी प्रमाण ९.२ टक्के एवढे आहे. संस्थेला सतत ‘अ’ वर्ग प्राप्त झालेला आहे. पतसंस्थेच्या ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, जुन्नर व बेल्हे या पाच शाखा आहेत. सभासदांना १२ टक्के लाभांश देणार आहे. तसेच, दीपावली भेटवस्तू देणार आहे.’’
यावेळी जुन्नर शाखेने शंभर टक्के कर्जवसुली व सुव्यवस्थापन केल्याबद्दल येथील कर्मचारीवर्गाचा अध्यक्ष संभाजी तांबे यांनी वैयक्तिक ११ हजार रुपये बक्षीस देऊन विशेष सत्कार केला.

मोनिका पतसंस्थेची सभा
येथेच मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या अध्यक्षा नीलिमा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यासभेसाठी मोनिका आशिष शहा, सुरेखा फापाळे, मेघना देशमुख, अश्विनी ढमाले, मंगल खेत्री, वैशाली बोचरे, मंजूषा डुंबरे, सुनंदा डुंबरे, सविता चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिरसाठ आदी उपस्थित होते. बाळासाहेब डुंबरे यांनी सूत्रसंचालन केले. ओतूर शाखा व्यवस्थापक योगेश तांबे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01773 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..