हिवरेत आढळला मृत बिबट्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिवरेत आढळला मृत बिबट्या
हिवरेत आढळला मृत बिबट्या

हिवरेत आढळला मृत बिबट्या

sakal_logo
By

ओतूर : हिवरे (ता.जुन्नर) येथील ज्ञानेश्वर विश्वनाथ शिंदे यांच्या शेताच्या बांधावर मृत बिबट्या आढळून आला. याबाबतची माहिती पोलिस पाटील विलास बबन खोकराळे यांनी वनविभागाला दिली. त्यानुसार ओतूरचे वनक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ खोडदचे सर्व कर्मचारी वनपाल बी.एस.शिंदे, वनरक्षक के.एस.भालेराव, वनरक्षक व्ही.आर.गुंड, वनसेवक एन.के.भोर, बी.के.वामन, किसन गुळवे घटनास्थळी बिबट्याचा पंचनामा केला. दोन बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला. घटनास्थळी सरपंच हिवरे सोमेश्वर जालिंदर सोनवणे, उपसरपंच दिगंबर भोर तसेच शेती मालक ज्ञानेश्वर शिंदे हे उपस्थित होते. मृत बिबट्याचे पशुवैद्यकीय अधिकारी शशिकांत डुंबरे यांनी शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01777 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..