Wed, Feb 8, 2023

ओतूरला बिबट्या पकडण्यात यश
ओतूरला बिबट्या पकडण्यात यश
Published on : 27 September 2022, 2:10 am
ओतूर, ता. २७ : येथील बाबीतमळा(ता. जुन्नर) येथे आज (ता.२७) नर जातीचा बिबट्या पिंजऱ्यात बंद झाल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. ओतूर येथील बाबीतमळा व कॅनॉल परिसरात बिबट्याचा वावर गेल्या काही महिन्यांपासून वाढला होता. येथील शालेय विद्यार्थांमध्येही भितीचे वातावरण होते. याबाबत येथील शेतकऱ्यांतर्फे वारंवार वनविभागाला माहिती दिली जात होती. या परिसरात शेळ्या मेंढ्यांवर ही बिबट हल्ला करत होता. त्यामुळे वनविभागाने दोन महिन्यापासून येथे बिबट पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. शेवटी मंगळवारी सायंकाळी त्यास पिंजऱ्यात पकडण्यास वनविभागाला यश आले. तो अंदाजे दोन वर्ष वयाचा आहे.
03270