राष्ट्रीय पोषण उपक्रमाचा उदापूरमध्ये सांगता सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय पोषण उपक्रमाचा
उदापूरमध्ये सांगता सोहळा
राष्ट्रीय पोषण उपक्रमाचा उदापूरमध्ये सांगता सोहळा

राष्ट्रीय पोषण उपक्रमाचा उदापूरमध्ये सांगता सोहळा

sakal_logo
By

ओतूर, ता. ४ ः उदापूर (ता. जुन्नर) येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना जुन्नर अंतर्गत ओतूर बिट १, २, ३ मार्फत पोषण माह सांगता सोहळा विठ्ठल-रुक्मिणी सभागृहात विविध उपक्रमांनी पार पडला.


पोषण दिंडीच्या माध्यमातून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उदापूर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष बबन कुलवडे होते. पोषण माहच्या निमित्ताने अंगणवाडी बालकांनी बाजारहाटची मांडणी केली होती. पालकांनी भाजीपाला खरेदी करुन मुलांना प्रोत्साहन दिले.

आहार प्रदर्शन व पोषण गुढी उभारून त्यामार्फत पोषणासंदर्भात संदेश देण्यात आले. गरोदर मातेचे ओटीभरण करण्यात येऊन आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

अंगणवाडी बालकांनी विविध संस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमास जुन्नर गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, बालविकास प्रकल्प अधिकारी निर्मला कुचिक, पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. महेश शेजाळ, उदापूरचे सरपंच सचिन आंबडेकर, उपसरपंच जयश्री अमूप, सर्व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संजय बुगदे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्रसंचालन गणेश मोढवे यांनी केले.
------------------