खामुंडीमध्ये कार जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खामुंडीमध्ये कार जळून खाक
खामुंडीमध्ये कार जळून खाक

खामुंडीमध्ये कार जळून खाक

sakal_logo
By

ओतूर, ता. ४ ः खामुंडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत नगर-कल्याण महामार्गावर हिंमत हवेलीजवळ कारने अचानक पेट घेतला. आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसल्याची माहिती ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.

ही घटना मंगळवारी पहाटे तीनच्या दरम्यान घडली. ओतूरकडून आळेफाट्याच्या दिशेने जाणाऱ्या स्कोडा कारने अचानक पेट घेतला. या कारमधून प्रवास करणाऱ्या दोघांनी प्रसंगावधान राखत बाहेर उडी घेतली. ही घटना समजताच सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलिस हवालदार राजेंद्र बनकर व डुंबरवाडी टोलवरील पथकांनी घटनास्थळी धाव घेत जुन्नर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. विजय रामचंद्र शेलार (रा. ठाणे) असे कारमालकाचे नाव आहे.
-------------------