ओतूर येथे स्पर्धा परीक्षा उद्‍बोधन कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओतूर येथे स्पर्धा परीक्षा
उद्‍बोधन कार्यशाळा
ओतूर येथे स्पर्धा परीक्षा उद्‍बोधन कार्यशाळा

ओतूर येथे स्पर्धा परीक्षा उद्‍बोधन कार्यशाळा

sakal_logo
By

ओतूर, ता. ११ : येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात एकदिवसीय स्पर्धा परीक्षा उद्‍बोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी बोलताना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान आणि सहायता कक्षाचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, विद्यार्थ्यांनी झोप उडविणारी स्वप्ने बाळगायला हवी. आपल्या नजरेतील स्वप्ने हातातील मोबाईलला दाखवा. जगात कोणतेही संकट सांगून येत नाही. बौद्धिक, शारीरिक, मानसिक क्षमता ओळखून स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागा. वयाच्या कोणत्या वर्षी अधिकारी किंवा यशस्वी उद्योजक व्हायचे हे आधीच ठरवून तयारीला लागले पाहिजे. दिवसातील चोवीस तासांचे योग्य नियोजन केल्यास सर्व काही शक्य आहे. जगातील कोणतीही गोष्ट कठोर परिश्रमाने आपण शक्य करू शकतो.’’

या कार्यशाळेत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान आणि सहायता कक्षामार्फत आयोजित ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कार्यशाळेत अध्यक्षतेस्थानी उपप्रचार्य डॉ. एस. एफ. ढाकणे होते. व्यासपीठावर उपप्रचार्य डॉ. के. डी. सोनावणे, डॉ. व्ही. एम. शिंदे, समन्वयक डॉ. नंदकिशोर उगले, मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. संतोष वाळके, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सुनील लंगडे, मराठी विभागप्रमुख डॉ. वसंतराव गावडे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. अमोल बिबे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. विनायक कुंडलिक, डॉ. रमेश काशीदे, डॉ. नीलेश काळे, डॉ.भूषण वायकर, सतीश दांगट, सुरेश थोरात यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेच्या समारोपानंतर विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभिप्राय घेऊन त्यांना प्रमाणपत्र दिले.