मढ परिसरातील धरणक्षेत्र, जंगलात पक्षी निरीक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मढ परिसरातील धरणक्षेत्र, जंगलात पक्षी निरीक्षण
मढ परिसरातील धरणक्षेत्र, जंगलात पक्षी निरीक्षण

मढ परिसरातील धरणक्षेत्र, जंगलात पक्षी निरीक्षण

sakal_logo
By

ओतूर, ता. १३ : मढ (ता. जुन्नर) परिसरात जुन्नर येथील वनविभागातर्फे पक्षी निरीक्षणाचा उपक्रम राबवण्यात आला. अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचा जन्मदिवस व पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सालीम अली यांची जयंती या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून हा पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला.
पक्षी सप्ताहानिमित्त मढ येथे ओतूर वनविभागाच्या वतीने यावर्षीही पक्षी निरीक्षणाचा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमामध्ये धरणक्षेत्र, माळरान, व जंगल परिसरात आढळणाऱ्या पक्षांचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये मढ परिसरात आढळणाऱ्या प्रजातींपैकी १८ ते २५ पक्षांची नोंद या उपक्रमात करण्यात आली.
पक्षी निरीक्षण कार्यक्रमासाठी पक्षी अभ्यासक व जुन्नर पर्यटन संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे, पक्षी अभ्यासक व साहित्यिक उत्तम सदाकाळ, पक्षी अभ्यासक राजकुमार डोंगरे, पक्षीमित्र नंदकुमार साबळे, पक्षी अभ्यासक अमर गायकवाड हे उपस्थित होते. यावेळी पक्षी अभ्यासकांनी पक्षी निरीक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या अणे माळशेज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना पक्षांबद्दलची रंजक माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे नोंदी करत परिसरातील पक्षांचे एका वेगळ्या दृष्टिकोनातून निरीक्षण केले. व मनात निसर्गाबद्दलचा आदरभाव अजूनच दृढ केला.
पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे नियोजन ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे,मढ वनपाल रवींद्र गवांदे वन, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी केले होते. तसेच या कार्यक्रमामध्ये अणे माळशेज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य पी.बी.पंडित व त्यांचे शिक्षक सहकारी व विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र सदाकाळ, सरपंच अरुणा मस्करे, उपसरपंच अशोक पानसरे त्याचप्रमाणे चित्रकार राहुल दांगट हे सुद्धा उपस्थित होते.

03423