ओतूर येथे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाय, वासराची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओतूर येथे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाय, वासराची सुटका
ओतूर येथे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाय, वासराची सुटका

ओतूर येथे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाय, वासराची सुटका

sakal_logo
By

ओतूर, ता.२२ : ओतूर (ता.जुन्नर) येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सहकार्याने कत्तलीसाठी घेवुन जात असताना एक गाय व वासराची सुटका करून जीवदान दिले आहे.
जुन्नर येथे कत्तलीसाठी एका टेम्पोत गाय व वासरू ओतूर-ओझर मार्गावरून घेवुन जात होते. यावेळी हिवरे खुर्द (ता.जुन्नर) येथील पुष्पावती नदीच्या पुलावर ऋषिकेश वायकर यांना संशय आल्याने त्यांनी टेम्पोला अडवून विचारणा केली. त्यावेळी या टेम्पो मागे असलेला दुचाकीवरील इसम दमदाटी करून निघून गेला, तर टेम्पो चालक ही उडवा उडवीची उत्तरे देत असल्यामुळे वायकर यांनी ओतूर पोलीसांना कळवले.
त्यानंतर पोलिसांनी टेम्पो चालकाची विचारपूस केल्यावर तो उडवा उडवीची उत्तरे देत होता. तर पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने शेतकऱ्याकडून गाय व वासरू विकत घेऊन कत्तलीसाठी जुन्नर येथे घेऊन जात असल्याचे कबूल केले.
तसेच ज्या ठिकाणी विक्री करणार आहे. त्यांची नावे माहीत नसून फक्त मोबाईल नंबर माहीत असल्याचे सांगितले. दरम्यान, ओतूर पोलिसांनी ऋषिकेश वायकर यांच्या फिर्यादीवरून बाळू रामराव पोटे, (वय ५२, रा.पिंपरी पेंढार, ता.जुन्नर) व लाल रंगाचे हिरो युनिकॉर्न मोटार सायकलवरील इसम तसेच अज्ञात इसम यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या वेळी विश्व हिंदू परिषद जुन्नर ग्रामीणचे अमोल रावत, बजरंग दल ग्रामीणचे संयोजक विनोद खंडागळे, राजमाता जिजाऊ गोशाळा मढ बारागावचे योगीराज महाराज पाटील, वीर बजरंगी ऋषीकेश वायकर उपस्थित होते. त्यांनी ओतूर पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचारीवर्गाचे या कारवाई बद्दल आभार मानले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक एम.एस.पठारे करीत आहे.