डिंगोरे येथे श्रमसंस्कार शिबिरास प्रतिसाद

डिंगोरे येथे श्रमसंस्कार शिबिरास प्रतिसाद

ओतूर, ता. ३० : ओतूर (ता. जुन्नर) येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डुंबरवाडी तसेच विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डिंगोरे येथे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिर आयोजित केले होते.
या शिबिराचे उद्‍घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, बबन तांबे, गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीहरी तांबे, सीमा सोनवणे, उपसरपंच नीलेश लोहोटे, प्राचार्य डॉ. जी. यु. खरात, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र उकिर्डे, संपत खरात, निलोफर पठाण त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. स्वप्नील डुंबरे, ग्रंथपाल श्यामराव बढे, प्रा. काजल फापाळे उपस्थित होत्या.
या शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांबरोबरच ग्रामस्थांसाठी योगा व प्राणायाम ६ ते ७.३० वाजेपर्यंत योग प्रशिक्षक अजित नलावडे व प्राचार्य डॉ. जी. यु. खरात यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या वेळी ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण असे उपक्रम राबविले. याप्रसंगी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्‍घाटन संस्थेचे मानद सचिव वैभव तांबे, उपाध्यक्ष श्रीहरी तांबे, सरपंच सीमा सोनवणे, नीलेश लोहटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. यु. खरात, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्राध्यापक स्वप्नील डुंबरे, डॉ. मोनिका रोकडे, कार्यालय अधिक्षक विशाल बेनके उपस्थित होते. या वेळी ३० दात्यांनी रक्तदान केले. नेत्र तपासणी शिबीरात डॉ. मनोहर डोळे फाउंडेशन नारायणगाव यांच्या सहकार्याने १०० पेक्षा जास्त ग्रामस्थांनी मोफत नेत्र तपासणी करून उपचार घेतले. माजी सैनिक रमेश खरमाळे यांचे पर्यावरणाची मानवी जीवनातील महत्त्व या विषयावर तसेच अजित नलावडे यांचे योगासन व प्राणायाम याविषयी, डॉ. मोनिका रोकडे यांचे संगणक विभाग यांचे डिजिटल इंडिया या विषयावर, डॉ. जी. यु. खरात यांचे स्वस्थ व निरोगी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगणक विभाग प्रमुख प्रा. सुनील खताळ, प्रा. नीता बाणखेले, प्रा. पूजा घोलप, प्रा. राजेंद्र डुंबरे, प्रा. सिद्धार्थ पानसरे, सीताराम सहाणे, गणेश उकिर्डे यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com