डुंबरवाडी येथे कन्या अभियान कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डुंबरवाडी येथे कन्या अभियान कार्यशाळा
डुंबरवाडी येथे कन्या अभियान कार्यशाळा

डुंबरवाडी येथे कन्या अभियान कार्यशाळा

sakal_logo
By

ओतूर, ता. १८ : ओतूर (ता. जुन्नर) येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डुंबरवाडी येथे निर्भय कन्या अभियान कार्यशाळेचे आयोजन केले होते.
या कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी अॅड. माधवी किशोर पोटे तसेच स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्वाती तांबे, जुन्नर तालुका तायक्वांदो ॲकॅडमी धनश्री जायकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. यु. खरात, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ. मोनिका रोकडे, संगणक विभाग प्रमुख डॉ. सुनील खताळ, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा. स्वप्नील डुंबरे मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. सचिन जाधव, प्रा. नीता बाणखेले उपस्थित होत्या. या वेळी अॅड. माधवी पोटे यांनी महाविद्यालयीन विद्यर्थिनींना स्त्री हक्क अधिकार समजावून सांगितला. तसेच विद्यार्थिनींनी स्वावलंबी कसे राहिले पाहिजे यावर मार्गदर्शन केले. डॉ. स्वाती तांबे यांनी आरोग्याविषयी आणि आहाराविषयी माहिती दिली. धनश्री जायकर यांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी प्रात्यक्षिके दाखवली. सूत्रसंचालन दर्शना शहा यांनी तर आभार प्रा. पूजा घोलप यांनी मानले.