हरिश्चंद्र गडावर भाविकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरिश्चंद्र गडावर भाविकांची गर्दी
हरिश्चंद्र गडावर भाविकांची गर्दी

हरिश्चंद्र गडावर भाविकांची गर्दी

sakal_logo
By

ओतूर, ता. १९ ः हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी असलेल्या खिरेश्वर येथे पुरातन हेमाडपंथी नागेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली होती. खिरेश्वर ग्रामस्थांच्या वतीने ११ ते १९ फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे नागेश्वर मंदिरात आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (ता. १७) रोजी श्री कळमजाई कलानाट्य मंडळ (धामणगाव) यांचा भारुडाचा कार्यक्रम पार पडला. शनिवारी (ता. १८) दुपारी कुस्त्यांचा जंगी आखाडा भरला होता. राजा हरिश्चंद्र गडावरही भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. राजा हरिश्चंद्रगड पुणे, नगर, ठाणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असल्याने या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गडावर येतात. महाशिवरात्रीनिमित्त राजा हरिश्चंद्र गडावर जुन्नर, नारायणगाव, ओतूर, आळेफाटा, राजुरी, बेल्हे, अणे, अकोले, ब्राम्हणवाडा, केळी, कोतुळ, मढ, सितेवाडी, कोपरे, मुथाळणे, मांडवे, खिरेश्वर, जांभुळशी, खुबी, सावर्णे, मुरबाड, टोकावडे आदी परिसरातून भाविक शिवरात्रीच्या आदल्या दिवशी हरिश्चंद्र गडावर मुक्कामी दाखल झाले होते. गडावर आलेल्या भाविकांसाठी अमरनाथ सेवा मंडळ जुन्नर, बनकर फाटा, उदापूर, आम्ही छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान डिंगोरे, स्वामी समर्थ मित्रमंडळ ओतूर, धोलवड, या सर्व मंडळांच्या वतीने हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला स्टॉल लावण्यात आले होते. हरिश्चंद्र गडावर आलेल्या भाविकांना खिचडी, केळी, चहा, पाणी बॉटल, चिक्की मोफत वाटप करण्यात आले. खिरेश्वर गावात ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी, होमगार्ड, राजा हरिश्चंद्र प्रतिष्ठानचे स्वयंसेवक यांच्या वतीने भाविकांसाठी उपाययोजना राबविण्यात आल्या.
3794