
कॅम्पस इट्रव्हीव्हमध्ये १४ जणांची निवड
ओतूर, ता. २७ : ओतूर (ता. जुन्नर) येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डुंबरवाडीमध्ये शनिवारी (ता. २५) करिअर लॅब पुणे मार्फत प्रे शीयन टेक्नॉलॉजी बंगळूर यांच्यासाठी कॅम्पस इट्रव्हीव्ह आयोजन करण्यात आले.
या कॅम्पस ड्राईव्ह उद्घाटनप्रसंगी करिअर लॅबस् कंपनीचे मनोज पडघन, रिजनल हेड ऑफ महाराष्ट्र राज्याचे सीनियर हायरिंग हेड मयंक यादव, अतुल सागर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. यु. खरात, महाविद्यालयीन प्लेसमेंट अधिकारी आणि मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. सचिन जाधव, संगणक विभागप्रमुख डॉ. सुनील खताळ, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख स्वप्नील डुंबरे उपस्थित होते.
या कॅम्पस ड्राईव्हसाठी ३८ विद्यार्थ्यांपैकी १४ विद्यार्थ्यांची ३.५ लाख रुपये पॅकेजवर कंपनीमध्ये निवड करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांची निवड ही दोन टप्प्यांमध्ये केली. त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न आणि मुलाखत याचा समावेश होता. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीचे अधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडून निवडपत्र देण्यात आली. सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे मानद सचिव वैभव तांबे यांनी अभिनंदन केले. कॅम्प यशस्वी करण्यासाठी सीनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर राहुल बनसोडे यांचे योगदान लाभले. कॅम्पसचा समारोप प्रा. पूजा घोलप यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.