ओतूर येथे मराठी भाषा स्वाक्षरी मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओतूर येथे मराठी भाषा स्वाक्षरी मोहीम
ओतूर येथे मराठी भाषा स्वाक्षरी मोहीम

ओतूर येथे मराठी भाषा स्वाक्षरी मोहीम

sakal_logo
By

ओतूर, ता. २७ : ओतूर (ता. जुन्नर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात सोमवारी मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. या वेळी महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. या निमित्ताने महाविद्यालयात मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मराठी भाषा स्वाक्षरी मोहीम काव्यवाचन, तसेच प्रा. डॉ. वसंत गावडे यांचे ‘मायबोली मराठी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे होते. या वेळी उपप्राचार्य डॉ. एस. एफ. ढाकणे, डॉ. व्ही. एम. शिंदे, डॉ. के. डी. सोनवणे, डॉ. सुनील लंगडे, डॉ. दत्तात्रेय टिळेकर, डॉ संतोष वाळके, डॉ. नीलेश काळे, डॉ. रमाकांत कस्पटे, डॉ. छाया तांबे तसेच विद्यार्थी उपस्थित होते. शुभदा गायकर, प्रियंका टिकेकर, वैभव जाधव, श्रावणी सूर्यवंशी व गायत्री शिंगोटे यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन डॉ. अमोल बिबे यांनी तर प्रा. रोहिणी मदने यांनी आभार मानले.