
धोलवडच्या सरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर
ओतूर, ता. २७ : धोलवड (ता. जुन्नर) येथील सरपंच सुधाकर ज्ञानेश्वर नलावडे यांच्या विरोधातील
अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.
धोलवडचे उपसरपंच सोमनाथ नलावडे व ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच सुधाकर नलावडे यांच्याविरोधात तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावावर सोमवारी (ता. २७) तहसीलदार सबनीस यांनी ग्रामपंचायतीत विशेष सभा बोलविली होती. यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने सात मते पडली. तर, विरोधात दोन मते पडली. त्यामुळे ठराव मंजूर झाल्याची माहिती तहसीलदार सबनीस व मंडलाधिकारी विजय फलके यांनी दिली.
यावेळी उपसरपंच सोमनाथ नलावडे, सदस्य सुनीता कालिदास नलावडे, ऊर्मिला सुभाष मुंढे, सुनीता सुदाम नलावडे, मंगल जनार्दन नलावडे, पौर्णिमा संदीप भोर, वैभव अजित नलावडे, संदीप रामचंद्र लवांडे, सुधाकर ज्ञानेश्वर नलावडे व ग्रामसेविका पी. डी. सदाकाळ आदी उपस्थित होते.