ओतूर येथे मराठी, विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओतूर येथे मराठी, विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रम
ओतूर येथे मराठी, विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रम

ओतूर येथे मराठी, विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रम

sakal_logo
By

ओतूर, ता. १ : ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात झाल्याची माहिती मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे यांनी दिली.
या दिनानिमित्ताने विद्यालयात मराठी विभाग प्रमुख देवचंद नेहे यांनी ‘गोदाकाठचा अष्टपैलू साहित्यिक वि. वा. शिरवाडकर’ यावर व्याख्यान दिले. तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमोद कुमार जाधव यांनी विज्ञानाचे फायदे व तोटे याबाबत मनोगत व्यक्त केले. या वेळी व्यासपीठावर अंजनी डुंबरे, प्रतीक अकोलकर, विजया गडगे, राजश्री भालेकर, भाऊसाहेब खाडे, राजेंद्र शिंदे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, अजित डांगे, संतोष सोनवणे, बाळासाहेब साबळे, ज्ञानदेव वळे, मिलिंद खेत्री, अमित झरेकर, भरत भाईक, लक्ष्मण दुडे, सोनाली माळवे, सोनाली कांबळे, अनिल जवरे, दिनेश ताठे, अपेक्षा गोरे, अश्विनी नलावडे, संजय डुंबरे, विजय खरात, रामदास ठोसर, प्रसन्न तांबे, शिवाजी उकिरडे, सुनील शितोळे, ईश्वर ढमाले, अरविंद अंबरे, संकेत कानवडे उपस्थित होते.