Fri, June 9, 2023

बिबट्याच्या हल्ल्यात
डिंगोऱ्यात ३ शेळ्या ठार
बिबट्याच्या हल्ल्यात डिंगोऱ्यात ३ शेळ्या ठार
Published on : 7 March 2023, 12:44 pm
ओतूर, ता. ७ : डिंगोरे (ता. जुन्नर) येथील वरखडे वस्तीवरील गोठ्यात घुसून बिबट्याने हल्ला करून तीन शेळ्या ठार केल्याची माहिती जुन्नर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.
डिंगोरे येथील वरखडे वस्तीवरील संजय दादू पारधी यांच्या घराशेजारील गोठ्यात बिबट्याने घुसून हल्ला करून तीन शेळ्या ठार केल्या असून, ओढून बाजूला नेल्या आहेत. यावेळी गोठ्यातील शेळ्यांची तीन करडे (पिल्ले) बिबट्याच्या तावडीतून सुखरूप वाचली. वनपाल एस. एस. बायचे, वनरक्षक विश्वनाथ बेले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच, शासकीय नियमानुसार पारधी यांना आर्थिक मदत वनविभागाकडून दिली जाईल, अशी माहिती दिली.