ओतूरला मधमाशी पालनाची आजपासून मोफत कार्यशाळा

ओतूरला मधमाशी पालनाची आजपासून मोफत कार्यशाळा

ओतूर ता.१५ : ओतूर (ता.जुन्नर) येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयामध्ये शेतकरी तसेच विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी (ता. १६) व शुक्रवारी (१७ मार्च) दोन दिवसीय मोफत मधमाशी पालन कार्यशाळा आयोजित केली आहे.
कार्यशाळेत मधमाशीचे शेतीमधील महत्त्व, प्रकार, पोळ्याची रचना, फुलांच्या झाडांची लागवड, पालनासाठी अवजारे, किडी व रोग व त्याचे नियंत्रण, मधमाशी पासून मिळणारे विविध पदार्थ, विविध हंगामात पेटीची काळजी, मधाचे व विविध प्रॉडक्ट्स चे फायदे, भारतातील आणि परदेशातील मधमाशीपालनामधला फरक, स्वतः मधमाशीच्या पेटीची हाताळणी व त्यांचे निरीक्षण, सरकारच्या मधमाशी पालन संदर्भात योजना, असे विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी प्रशिक्षण देण्यासाठी पुणे येथील केंद्रीय मधमाशी पालन प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे मास्टर ट्रेनर प्रा. हेमंतकुमार डुंबरे हे उपस्थित राहणार आहेत. जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे. सर्वानी सहभागी होण्यासाठी अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात ऑफिसमध्ये किंवा प्रा डॉ.व्ही.डी.जाधव, मोबाईल नंबर -९८९०२२९०३७ यांच्याशी संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com