मधमाशी पालन कार्यशाळेस प्रतिसाद

मधमाशी पालन कार्यशाळेस प्रतिसाद

ओतूर, ता. २१ : ओतूर (ता. जुन्नर) येथील अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयात दोन दिवसीय मधमाशी पालन कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकरी, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मधमाशीचे शेतीमधील महत्त्व, मधमाशांचे प्रकार, त्यांच्या मधपोळ्याची वैज्ञानिक रचना, मधाच्या अनुषंगाने फुलांच्या झाडाची लागवड, मधमाशी पालनासाठी योग्य असणारी अवजारे, कीड रोग आणि त्यांचे नियंत्रण, मधमाशीपासून मिळणारे विविध पदार्थ, तसेच विविध हंगामात पेटीची घ्यावयाची काळजी, मधाचे विविध प्रॉडक्शन व फायदे, भारतातील आणि परदेशातील मधमाशी पालनातला फरक, पेटीची हाताळणी व निरीक्षण आणि सरकारच्या मधमाशी पालनासंदर्भातील शासनाच्या विविध योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले.
हे प्रशिक्षण पुणे येथील केंद्रीय मधमाशी पालन प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे मास्टर ट्रेनर प्रा. हेमंत डुंबरे यांनी दिले. त्यात त्यांनी मधमाशी पालन पेटीचे प्रात्यक्षिक व ही पेटी कशी हाताळावी याची माहिती प्रात्यक्षिकासह दिली. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील झूलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. व्हि. डी. जाधव यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे होते. कार्यक्रमात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. व्ही. डी. जाधव, सूत्रसंचालन प्रा. सागर पारधी यांनी तर आभार डॉ. एन. एच. हांडे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com