Wed, Sept 27, 2023

डुंबरवाडीच्या फार्मसी महाविद्यालयाला संशोधन केंद्राचा मान्यता
डुंबरवाडीच्या फार्मसी महाविद्यालयाला संशोधन केंद्राचा मान्यता
Published on : 26 April 2023, 10:23 am
ओतूर, ता. २६ : डुंबरवाडी (ता. जुन्नर) येथील शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी या ठिकाणी २०२३-२४ शैक्षणिक वर्षापासून विज्ञान व तंत्रज्ञान पीएचडी फार्मसी संशोधन केंद्र म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मान्यता मिळाली आहे.
पीएचडी संशोधन केंद्रासाठी मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश दामा, डॉ. किरण महाजन, डॉ. नितीन डेव्हडराव, डॉ. हर्षल तारे यांसारख्या अनुभवी तज्ञांची निवड केली आहे. आणि येणाऱ्या कालावधीत महाविद्यालयातील अनेक तज्ञ मार्गदर्शकांची निवड करण्यात येणार आहे. औषध निर्माण शास्त्रातील फार्मासुटिक्स, फार्माकोग्नोसी, फार्मासुटिकल केमिस्ट्री अशा विविध विषयांत संशोधन करण्याची संधी संशोधक उमेदवारांना इथे उपलब्ध होणार आहे.