Fri, Sept 29, 2023

उदापुरात बिबट्याचा
मेंढ्यांवर हल्ला
उदापुरात बिबट्याचा मेंढ्यांवर हल्ला
Published on : 8 May 2023, 2:27 am
ओतूर, ता. ८ : उदापूर (ता. जुन्नर) येथील कुलवडे मळा येथे बिबट्याने मेंढरांच्या कळपावर हल्ला करून एक मेंढी जखमी केली.
कुलवडे मळा येथे संदीप कुलवडे यांच्या पाळीव कुत्र्यावर सोमवारी सकाळी घरासमोरच ट्रॅक्टरच्या बाजूला अचानक बिबट्याने हल्ला केला. कुत्रे मोठ्याने ओरडल्याने संदीप यांचे लक्ष गेले; तर बिबट्याची कुत्र्यावरची झडप चुकली होती. बिबट्या तेथून पळून गेला. त्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास याच परिसरात मेंढ्यांचा कळप चरत असताना बिबट्याने हल्ला करून एक मेंढी जखमी केली.
वनविभागाने या परिसरात पाहणी करून बिबट्याच्या बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी संपत कुलवडे, दिनेश कुलवडे, संदीप कुलवडे, अनिकेत सस्ते, मयूर कुलवडे,स्वप्नील कुलवडे यांनी केली.