उदापूर येथे बिबट्याच्या
हल्ल्यात बोकड ठार

उदापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार

ओतूर, ता. १४ ः उदापूर (ता. जुन्नर) येथील वरील आळी येथे घराच्या आवारात घुसून बिबट्याने बोकडावर हल्ला करून ठार केले. ही घटना रविवारी पहाटे तीन दरम्यान घडली. यात बबन रामचंद्र शिंदे याचा एक बोकड बिबट्याने ठार केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बबन रामचंद्र शिंदे हे वरील आळी येथे राहत असून शेतमजुरी सह शेळी पालन ही करतात. रविवारी पहाटे ते पत्नी सह घराच्या आवारात झोपले होते. पहाटे तीन दरम्यान त्यांच्या जवळ बांधलेल्या छोट्या बोकडावर बिबट्या घराच्या मागच्या बाजूने सिमेंट कंपाउंडच्या भिंती वरून उडी मारून आत प्रवेश करून बोकडाला पकडून मेन गेटने बाहेर घेऊन जात होता. बिबट्याला पाहिल्यावर बबन शिंदे मोठ्याने ओरडले. त्यामुळे बिबट गेटला धडकला व केलेली बोकडाची शिकार तेथेच सोडून पळून गेला.
सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकार वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक एस. ए. राठोड यांनी वनकर्मचाऱ्यांस घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com