ओतूर येथे ‘शासन आपल्या दारी’ अभियान

ओतूर येथे ‘शासन आपल्या दारी’ अभियान

ओतूर, ता. १५ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायत सभागृहात शासन आपल्या दारी अभियानाचा प्रारंभ करण्यात आल्याची माहिती ओतूरचे सरपंच प्रशांत डुंबरे व मंडलाधिकारी विजय फलके यांनी दिली.
शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी ''शासन आपल्या दारी'' हे अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानात महसूल विभागामार्फत रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, वय, अधिवास, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना या सुविधा दिल्या जाणार आहे.
सर्व शासकीय विभाग यांच्याकडून विविध योजनांसाठी पात्र लाभार्थी यांच्याकडून फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. १५ मेपासून ओतूर व परिसरातील पालक व विद्यार्थी यांनी शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना दाखले काढण्याकामी व इतर सर्व शासकीय विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ओतूर येथील ग्रामपंचायत हॉल येथे सकाळी १० वाजता ओतूर मंडल विभागातील ओतूर, धोलवड, ठिकेकरवाडी, डुंबरवाडी, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, चिल्हेवाडी, उंब्रज, खामुंडी, अहिनवेवाडी, हिवरे खुर्द, मांदारणे, कोपरे, मांडवे, मुथाळणे, जांभूळशी या १७ गावातील नागरिकांना ओतूर येथे उपस्थित राहण्यासाठी महसूल व सर्व शासकीय विभाग, कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. या ठिकाणी १५ ते २० मे पर्यंत सर्व शासकीय कार्यालयातील शासकीय योजनांचे पात्र लाभार्थ्यांकडून फॉर्म भरून घेणे २२ ते २७ पात्र लाभार्थ्यांच्या फॉर्म ची वरिष्ठ कार्यालयाकडून मान्यता घेणे आणि प्रत्यक्ष पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र दाखले इत्यादी वस्तू स्वरूपाचे प्रत्यक्ष वाटप लाभार्थ्यांना ३१ मे रोजी करण्यात येणार असल्याची माहिती ओतूर विभागाचे मंडलाधिकारी विजय फलके तलाठी अतुल विभूते यांनी दिली.
सदरचे अभियान जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस व ओतूर मंडलचे पालक अधिकारी सचिन सरसमकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी विजय फलके, महसुल विभाग, ग्रामपंचायत विभाग, वनविभाग, आरोग्य विभाग, सहकार विभाग, पॅनकार्ड विभाग, नागरी सुविधा केंद्राचे प्रतिनिधी हे व इतर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com