ओतूर येथे अपघातात
दोन ठार, एक जखमी

ओतूर येथे अपघातात दोन ठार, एक जखमी

ओतूर, ता. १५ : ओतूर (ता. जुन्नर) येथील ओतूर-ब्राह्मणवाडा मार्गावर सोमवारी (ता. १५) दुपारी दुचाकी व अल्टो मोटारीच्या धडकेत दोन जण ठार झालेड तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात संजय रखमा भांगरे (वय २४, रा. सवतवाडी, साकिरवाडी, ता. अकोले, जि. नगर) व धनराज सुनील भांगरे (वय २२, रा. कोहने, ता. अकोले, जि. नगर) हे ठार झाले असून, कृष्णा काशिनाथ गोडे हा जखमी झाला आहे.
याबाबत ओतूर पोलिसांनी माहिती दिली की, संजय भांगरे, धनराज भांगरे व कृष्णा गोडे हे ओतूरकडून ब्राह्मणवाडा दिशेने चालले होते. त्याच वेळी ब्राह्मणवाडा बाजूने ओतूरकडे अल्टो मोटार येत होती. ओतूर गावच्या हद्दीत दुचाकी व अल्टो मोटारची धडक झाली. त्यात दुचाकीवरील संजय भांगरे, धनराज भांगरे हे ठार झाले तर कृष्णा गोडे हे जखमी झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com