ओतूरला १२ वीच्या विद्यार्थ्यांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओतूरला १२ वीच्या विद्यार्थ्यांचे यश
ओतूरला १२ वीच्या विद्यार्थ्यांचे यश

ओतूरला १२ वीच्या विद्यार्थ्यांचे यश

sakal_logo
By

ओतूर, ता. २७ : ओतूर (ता. जुन्नर) येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सावित्रीबाई फुले विद्यालय व सीताबाई तांबे ज्युनिअर कॉलेज उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०२३ कला शाखेचा निकाल ८९.५९ टक्के लागला. यात सुवर्णा बुधा मुकणे ७६.८३, अपेक्षा महादू भोईर ७४.६७, साक्षी संजय तळपे ७३, कीर्ती लक्ष्मण सांगडे ६६.८३, नीलेश संभाजी भूतांबरे ६४.१७ असे गूण प्राप्त करत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. तर वाणिज्य शाखेचा निकाल ९६.६६ टक्के लागला. यात कृतिका शिवाजी मरभळ ७६.८३, सुवर्णा बाळू डोके ७१, अक्षदा बाळू हांडे ७०.८३, प्रेरणा राजेंद्र कांबळे ७०, अशिया अली शेख ६९.५० सदर परीक्षेसाठी १२ वी कला शाखेचे ४९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या पैकी ४३ उत्तीर्ण झाले असून बारावी वाणिज्य शाखेचे ३० विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यातील २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे, संस्थेचे सचिव वैभव तांबे, संस्थेचे उपाध्यक्ष श्रीहरी तांबे, खजिनदार मयूर ढमाले, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका नीलम तांबे यांनी सर्व कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.