संतराज महाराज पालखी कारखेल येथून पंढरपूरला मार्गस्थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संतराज महाराज पालखी कारखेल येथून पंढरपूरला मार्गस्थ
संतराज महाराज पालखी कारखेल येथून पंढरपूरला मार्गस्थ

संतराज महाराज पालखी कारखेल येथून पंढरपूरला मार्गस्थ

sakal_logo
By

उंडवडी, ता. १ : कारखेल (ता. बारामती) येथे मुक्कामी आलेल्या श्री. संतराज महाराज पालखी सोहळ्याचे गावकऱ्यांनी उत्साहात स्वागत केले. क्षेत्र वाळकी-संगम रांजणगाव बेट (ता. दौंड) येथून पंढरपूरकडे निघालेला श्री. संतराज महाराज पालखी सोहळा कारखेल येथे (ता. ३० जून) रोजी गुरुवारी रात्री मुक्कामी आला. या पालखी सोहळ्याचे कारखेलकरांनी टाळ मृदुंगाच्या निनादात मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात स्वागत केले. सायंकाळी ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करत पालखी सोहळा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विसावला. आरती झाल्यानंतर भजन, कीर्तन व पालखीच्या दर्शनाचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी घेतला. गावकऱ्यांच्या वतीने वारकऱ्यांना रात्री लाफशीचे भोजन देण्यात आले. दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) सकाळी पालखी सोहळ्याला गावकऱ्यांनी भक्तिभावाने निरोप दिला. सोनवडी सुपे येथेही गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात टाळ मृदुंगाच्या निनादात व फटाक्यांची आतषबाजी करून पालखी सोहळ्याचे स्वागत केले. येथे आरती, भजन व ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करत पालखी सोहळा सकाळची न्याहरी करण्यासाठी विसावला. त्यानंतर पालखी सोहळा ज्ञानोबा तुकाराम महाराजांचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला.

Web Title: Todays Latest District Marathi News Und22b01521 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..