पाटस रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटस रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू
पाटस रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू

पाटस रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू

sakal_logo
By

उंडवडी, ता. १० : बारामती - पाटस रस्त्यावर नुकत्याच झालेल्या पावसाने ठिकठिकाणी खड्डे पडले होते. ते बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हाती घेतले आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरच खड्डे मुक्त होणार असल्याने वाहनचालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

श्री संत तुकाराम महाराज महामार्ग अर्थात बारामती-पाटस रस्त्यावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे या खड्यात अनेक वाहने आपटून नुकसान होत होते. या रस्त्यावर खड्ड्यामुळे छोटे-मोठे आपघातही देखील घडत आहेत. यामुळे रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी, अशी वाहनचालकांची मागणी होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची खडी, डांबर टाकून डागडुजी सुरु केली आहे. बारामती रिंग रोडपासून ते बऱ्हाणपूरपर्यंतचे आठ किलोमीटर अंतरातील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजविले आहेत.
लवकरच या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून रस्ता खड्डे मुक्त होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना हा रस्ता वाहतूकीसाठी सोईस्कर होणार आहे.

01552

Web Title: Todays Latest District Marathi News Und22b01537 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..