उंडवडी कडेपठार येथे श्रमदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उंडवडी कडेपठार येथे श्रमदान शिबिर
उंडवडी कडेपठार येथे श्रमदान शिबिर

उंडवडी कडेपठार येथे श्रमदान शिबिर

sakal_logo
By

उंडवडी, ता. १६ : उंडवडी कडेपठार (ता. बारामती) येथे बारामती कॉलेज ऑफ फार्मसीचे सात दिवसीय विशेष श्रमदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात विविध उपक्रम घेण्यात आले.
कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने डॉ. आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे राष्ट्रीय सेवा योजना व कार्य हीच ओळख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिराचे उद्‌घाटन बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले.
या सात दिवसाच्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी श्रमदानाबरोबरच विविध सामाजिक कार्यक्रम राबविले. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्रीभ्रृण हत्येच्या व घरगुती जबाबदारीमुळे थांबलेले महिला शिक्षण या विरुद्ध आवाज उठवणारे पथनाट्य गावामध्ये सादर केले. तसेच ब्लड ग्रुप डीटेक्षण कॅम्प व महिला साक्षरता सर्वेक्षण सर्व्हे करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये इको रेस्कूचे नचिकेत सुधीर अवधानी यांनी प्राण्यांचे संगोपन व पुनर्वसन याची माहिती दिली. दरम्यान, बारामतीच्या वनअधिकारी शुभांगी लोणकर यांनी कॅम्पला भेट दिली. तसेच प्रसिद्ध पर्यावरण पत्रकार किसन काळे यांनी ‘पर्यावरण पुनर्वसन कसे करावे’ याबद्दल मार्गदर्शन केले. पर्यावरण अभ्यासक डॉ. महेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसोबत उंडवडीच्या माळरानावर फिरून तेथील जैवविविधता, विविध वनस्पती, प्राणी पक्षी यांची माहिती दिली. प्रसिद्ध वेबसिरीज चांडाळ चौकडीच्या करामती फेम रामभाऊ जगताप यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व व संकल्पना तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सेवा, त्याग आणि शिक्षण क्षेत्रातून होणारा संस्कार याबाबत मार्गदर्शन केले. निवृत्त वन अधिकारी, महाराष्ट्र शासन व वन्यजीव
अभ्यासक प्रभाकर कुकडोलकर यांनी मानव व वन्य प्राणी संघर्ष (कारणे व उपाय योजना) याची माहिती दिली. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्राण्यांचे मानवी वस्तीमध्ये होणारे पलायन याविषयी माहिती दिली.
तसेच एनएनएस कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीकृष्ण बावकर व कार्य हीच ओळख फाउंडेशनचे अध्यक्ष समीर बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी सात दिवस श्रमदान केले. यामध्ये झाडांच्या बुडातील सफाई करून आळे दुरुस्ती करणे, दगड व मातीचे बांध तयार करणे, कॅम्प परिसरात रस्ते तयार करणे, समतल चर तयार करणे, कंपोस्ट खत तयार करणे, दगडी पार तयार केले. तर शिबिराच्या समारोपप्रसंगी सुमारे ७५ देशी वृक्षांची लागवड केली.