मका पिकासह ठिबक सिंचनला आग

मका पिकासह ठिबक सिंचनला आग

उंडवडी, ४ : गोजुबावी (ता. बारामती) येथे विजेच्या तारांचे शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत मका, उसाच्या पिकासह ठिबक सिंचन जळून खाक झाले आहे. त्यामुळे तीन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
येथील गट नंबर १६२ मध्ये शेतकरी नारायण महादेव झोरे यांची मका हे पीक होते. या पिकाला ठिबक केलेले होते. त्यांच्या शेतातून विजेचे खांब व तारा गेलेल्या आहेत. वाऱ्यामुळे तारांचे घर्षण होऊन आगी गोळ्याने मका पीक ठिबक सिंचनासह जळून खाक झाले आहे. त्यामुळे झोरे यांचे पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
तसेच शेजारील शेतकरी शालन मल्हारी जाधव व पांडुरंग जाधव यांचे दोन एकर ऊस व ठिबक सिंचन संच जळून भस्मसात झाले. यामुळे जाधव यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा कामगार तलाठी यांनी केला. याबाबत शेतकरी गणेश झोरे म्हणाले, आमच्या शेतात दोन दिवसात या घटना घडल्या आहेत. आम्ही महावितरणाला देखील कळविले आहे. महावितरण घटनेची पाहणी करून आम्हाला पिकांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी गणेश झोरे यांनी केली आहे.

01743

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com