टिळेकरवाडी येथे शेतकऱ्यांना विक्री व्यवस्थेबाबत मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टिळेकरवाडी येथे शेतकऱ्यांना विक्री व्यवस्थेबाबत मार्गदर्शन
टिळेकरवाडी येथे शेतकऱ्यांना विक्री व्यवस्थेबाबत मार्गदर्शन

टिळेकरवाडी येथे शेतकऱ्यांना विक्री व्यवस्थेबाबत मार्गदर्शन

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. १६ : टिळेकरवाडी (ता. हवेली) येथे मॉडेल व्हिलेज उपक्रमांतर्गत विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन केले होते. या वेळी शेतकर्ऱ्यांना मार्गदर्शन केले.
शेतकरी मेळाव्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे ज्ञानेश्वर बोठे यांनी नावीन्यपूर्ण पद्धतीने व विक्री व्यवस्थेचा अभ्यास करून पीक पद्धतीचा अवलंब करावा, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रक्षेत्र भेटीमधून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. उपविभागीय कृषी अधिकारी पुणे सत्यवान नऱ्हे मारुती साळे, तालुका कृषी अधिकारी हवेली डॉ. सोमनाथ माने, डॉ. श्रीहरी हसबनीस, डॉ. धर्मेंद्र फाळके, डॉ. सुनील जोगदंड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी गुलाबराव कडलग, कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळुंजकर, रामदास डावखर, राजेंद्र टिळेकर, रोहिदास टिळेकर, संतोष टिळेकर, महेश सुरडकर, नागेश मेहत्रे, शंकर चव्हाण, महेश महाडीक, ज्योती हिरवे, मुक्ता गर्जे आदी उपस्थित होते.

00007

Web Title: Todays Latest District Marathi News Unk22a00003 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top