उद्यापासून सुरू होणार सोरतापवाडी गणेश फेस्टिव्हल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्यापासून सुरू होणार
सोरतापवाडी गणेश फेस्टिव्हल
उद्यापासून सुरू होणार सोरतापवाडी गणेश फेस्टिव्हल

उद्यापासून सुरू होणार सोरतापवाडी गणेश फेस्टिव्हल

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. ३० : ‘सोरतापवाडी गणेश फेस्टिव्हल २०२२'' मध्ये विविध‌ सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. होम मिनिस्टर, ऑर्केस्ट्रा, व्याख्यान, विविध स्पर्धा, लावणी, नाटक आणि कीर्तनाचा समावेश असल्याने हा फेस्टिव्हल म्हणजे रसिकांसाठी एक सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.
सोरतापवाडी (ता. हवेली) येथील सुदर्शन युवा मित्र मंडळाच्यावतीने १ ते ९ सप्टेंबर या दरम्यान “सोरतापवाडी गणेश फेस्टिवल २०२२” चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलचे उद्‍घाटन गुरुवारी (१ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार नीलेश राणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी ३१ ऑगस्ट (बुधवार) सायंकाळी सात वाजता श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी दिली.
या फेस्टिव्हलमध्ये बुधवारी (ता. ३१) श्रींची प्रतिष्ठापना संध्याकाळी ७ वाजता करण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. ०१) सकाळी कार्यक्रमाचे उद्‍घाटन व संध्याकाळी खेळ रंगला वहिनींचा होम मिनिस्टर, शुक्रवारी (ता. ०२) संध्याकाळी ऑर्केस्ट्रा, शनिवारी (ता. ०३) प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे शिव व्याख्यान, रविवारी (ता. ०४) डान्स व मिमिक्री स्पर्धा, सोमवारी (ता. ०५) संतोष पवार प्रस्तुत नाटक सुंदरा मनात भरली. मंगळवारी (ता. ०६) प्रसिद्ध लावण्यांचा कार्यक्रम तुमच्यासाठी काय पण, बुधवारी (ता. ०७) हा जल्लोष महाराष्ट्राचा, गुरुवारी (ता. ०८) प्रसिद्ध कीर्तनकार रामराव महाराज ढोक यांचे संपूर्ण कीर्तन, शुक्रवारी (ता. ०९) भव्य विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Unk22a00066 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..